१४३ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी

By Admin | Updated: January 27, 2015 23:56 IST2015-01-27T23:56:46+5:302015-01-27T23:56:46+5:30

वाशिम जिल्हा नियोजन समितीची सभा; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा.

Approval of draft plan of Rs. 143 crores | १४३ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी

१४३ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मंजुरी

वाशिम : जिल्हा वार्षिक योजना २0१५-१६ च्या एकूण १४३ कोटी ४१ लाख २ हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्याला राज्याच्या गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय विभाग, संसदीय कार्य विभागाचे राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सोनाली जोगदंड, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हाधिकारी बी.के. इंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सर्व पदाधिकारी, अशासकीय सदस्य व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिलेल्या प्रारुप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक नियोजन सर्वसाधारण योजनेसाठी ७९ कोटी ३ लाख रुपये, अनुसूचित जाती योजनेसाठी ४८ कोटी ९0 लाख व आदिवासी उपयोजनेसाठी १५ कोटी ४८ लाख २ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त विविध यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांसाठी १६९ कोटी ९३ लाख २८ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीचा मागणी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यास समितीने या सभेत मंजुरी दिली.

Web Title: Approval of draft plan of Rs. 143 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.