श्रावण बाळ योजनेंतर्गत ६९३ प्रस्तावांना मंजुरी
By Admin | Updated: July 20, 2014 23:06 IST2014-07-20T22:52:55+5:302014-07-20T23:06:58+5:30
निराधार वयोवृध्दांसाठीच्या श्रावण बाळ योजनेंतर्गत मालेगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेल्या ६९३ प्रस्तावांना मंजूरात देण्यात आली.

श्रावण बाळ योजनेंतर्गत ६९३ प्रस्तावांना मंजुरी
वाशीम : निराधार वयोवृध्दांसाठीच्या श्रावण बाळ योजनेंतर्गत मालेगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेल्या ६९३ प्रस्तावांना मंजूरात देण्यात आली. निराधार वृध्दांसाठीच्या या योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यासाठी मालेगाव तहसील कार्यालयात वृध्दांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. १८ जूलै रोजी तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीच्या झालेल्या बैठकित तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या ६९३ प्रस्तावामध्ये असलेल्या बीपीएलच्या २00, एपिएलच्या ३५९ तथा विकलांग विधवांच्या १३४ प्रस्तावांना मंजूरात देण्यात आली. यावेळी मालेगावच्या संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्याम काबरा, सदस्य आत्माराम हांडे, भिकाराव घुगे, रंजना काळे, सुखदेव मोरे, गंगाराम सुखे, अफरोज पठाण तसेच सुनिल चंदनशिव आदी उपस्थित होते. यावेळी समिती अध्यक्षांनी उपस्थित वृध्द निराधारांना योजनेसंबंधी विस्तृत माहिती दिली.