झनक यांची हळद संशोधन व प्रक्रिया धोरण समिती सदस्यपदी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:56+5:302021-04-06T04:40:56+5:30
हळद पिकाच्या लागवडीपासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण समिती निश्चित करण्यात ...

झनक यांची हळद संशोधन व प्रक्रिया धोरण समिती सदस्यपदी नियुक्ती
हळद पिकाच्या लागवडीपासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण समिती निश्चित करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील पर सदस्यपदी आमदार अमित झनक, आमदार महेश शिंदेसह एकूण सात जणांची नियुक्ती करण्यात आली. हळद उत्पादक शेतकऱ्यांना विशेषता हळद विक्रीसाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. ही धोरण समिती शेतकऱ्यांना लागवडीपासून काढणी प्रक्रियापर्यंत येणाऱ्या अडचणींचा अभ्यास ही समिती करणार आहे. वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक हळद लागवड मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसर व रिसोड तालुक्यात केली जाते. नुकत्याच गठित केलेल्या हळद लागवड प्रक्रिया समितीच्या सदस्यपदी आमदार झनक यांची नियुक्ती झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांचा अडचणी सोडविण्यास मदत होईल.