शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST2021-07-23T04:25:26+5:302021-07-23T04:25:26+5:30

२०२०-२१ मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व ...

Applications for Scholarship Schemes are invited | शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज मागविले

शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज मागविले

२०२०-२१ मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत बाकी राहिलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घ्यावे लागणार आहेत. महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज भरण्याची ही अंतिम संधी राहणार आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलला फार कमी प्रमाणात नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हयातील सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वरील योजनांचे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी आपल्या स्तरावरुन सूचना द्याव्या, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी केले.

Web Title: Applications for Scholarship Schemes are invited