आराेग्याची काळजी घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:39 IST2021-08-29T04:39:18+5:302021-08-29T04:39:18+5:30

काेराेना लस घेण्याचे आवाहन वाशिम : जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, दुसऱ्या डोससाठी ...

Appeal to take care of health | आराेग्याची काळजी घेण्याचे आवाहन

आराेग्याची काळजी घेण्याचे आवाहन

काेराेना लस घेण्याचे आवाहन

वाशिम : जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्तींच्या सोयीसाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी केले. तसेच ज्यांनी अद्याप पहिला डाेस घेतला नाही त्यांनीसुद्धा लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बसस्थानकात खड्डे; प्रवाशांना त्रास

वाशिम : जिल्हयातील अनेक बसस्थानक परिसरात खड्डे निर्माण झाले असून, याचा प्रवाशांना पावसाळ्याच्या दिवसात त्रास सहन करावा लागत आहे. अनेक बसस्थानकांत अद्यापपर्यंत मूलभूत सुविधा उभारण्यात आलेल्या नाहीत. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, दुर्गंधी सुटत असल्याने चालक, वाहक व प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

Web Title: Appeal to take care of health