शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:40+5:302021-03-18T04:41:40+5:30
शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन वाशिम : २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी माहिती व तंत्रज्ञानतर्फे पोर्टल कार्यान्वित ...

शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन
शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन
वाशिम : २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी माहिती व तंत्रज्ञानतर्फे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र या प्रवर्गांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन योजनांकरिता नवीन प्रवेशित व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू असून, विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलला फार कमी प्रमाणात नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना या योजनांचे अर्ज भरण्यासाठी आपल्या स्तरावरून आवाहन करावे. तसेच २०१९-२० मधील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांच्या बाकी राहिलेल्या अर्जांवर दिलेल्या वेळेत तत्काळ कार्यवाही करून घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांनी केले आहे.