पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:36+5:302021-02-05T09:24:36+5:30
.............. मजुरांना आक्षेपासाठी १५ दिवसांची मुदत वाशिम : फळ रोपवाटिका, तालुका बीजगुणन केंद्रांमधील रोजंदारी मजुरांची अंतरिम ज्येष्ठता सूची जिल्हा ...

पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
..............
मजुरांना आक्षेपासाठी १५ दिवसांची मुदत
वाशिम : फळ रोपवाटिका, तालुका बीजगुणन केंद्रांमधील रोजंदारी मजुरांची अंतरिम ज्येष्ठता सूची जिल्हा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीत नाव नसल्याबाबत आक्षेप असल्यास संबंधितांनी १५ दिवसांत लेखी पुराव्यासह संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
.................
आरक्षण सोडतीकडे ग्रामस्थांचे लक्ष
मेडशी : येथील ग्रामपंचायतीची निवडणूक १६ जानेवारी रोजी होऊन १८ जानेवारीला निकाल जाहीर झाला. दरम्यान, २ फेब्रुवारीला सरपंचपदाची आरक्षण सोडत असून त्याकडे विजयी उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
..................
‘सुपर ओव्हर’मध्ये मालेगाव संघ विजयी
मालेगाव : येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटच्या अंतीम सामन्यात ‘सुपर ओव्हर’ होऊन मालेगाव वकील संघाने बाजी मारली. वाशिमचा वकील संघ उपविजेता ठरला. यावेळी अॅड. शंकर मगर, सतीश शिरसाट, संतोष बोरचाटे, बाबुराव तायडे, प्रदीप सहस्त्रबुद्धे, विजय बळी, अमोल तायडे, महेश शेलकर, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, सैय्यद इम्रान, विवेकानंद सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.