सुरक्षित फवारणी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:46+5:302021-07-30T04:43:46+5:30
------------------------ उडिद, मुगाचे पीक वन्यप्राण्यांकडून फस्त वाशिम : खरीप हंगामातील शेंग धारणेच्या स्थितीत असलेले उडिद, मुगाचे पीक वन्यप्राणी फस्त ...

सुरक्षित फवारणी करण्याचे आवाहन
------------------------
उडिद, मुगाचे पीक वन्यप्राण्यांकडून फस्त
वाशिम : खरीप हंगामातील शेंग धारणेच्या स्थितीत असलेले उडिद, मुगाचे पीक वन्यप्राणी फस्त करीत आहेत. हरीण, माकड आदी वन्यप्राणी या पिकांत धुमाकूळ घालत असल्याचे चित्र गुरुवारीही पहायला मिळाले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली.
------
कमी उंचीच्या पुलामुळे अपघाताची भीती
वाशिम : रिसोड तालुक्यातील रिसोड ते गोभणी या दोन गावांदरम्यान असलेल्या रस्त्यात पैनगंगा नदीपात्रात पुलाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली. या पुलाची उंची कमी असून, पाऊस आला की पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे येथे अपघात घडण्याची भीती आहे.
---------------
प्रकल्प तहानलेलेच
वाशिम : यंदा वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात दमदार पाऊस पडत आहे. तथापि, सार्वत्रिक पावसाचा अभाव असल्यामुळे या तालुक्यातील तळप येथील प्रकल्पासह एक, दोन लघुप्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.
--------------
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार चौकात वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर गुरुवारी पोलिसांनी कारवाई केली.
---
अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई
वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव पोलीस चौकीअंतर्गत विविध गावांत अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर धनज पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली असून, या आठवड्यात विविध ठिकाणी छापेही टाकले आहेत.