शेतातील कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:37 IST2021-03-15T04:37:38+5:302021-03-15T04:37:38+5:30
जिल्ह्यात तूर , हरभरा पिकाची काढणी जवळपास झालेली आहे आणि गहू पिकाची काढणी सुरू आहे शेतामध्ये पिकाच्या धसकटे ...

शेतातील कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीचे आवाहन
जिल्ह्यात तूर , हरभरा पिकाची काढणी जवळपास झालेली आहे आणि गहू पिकाची काढणी सुरू आहे
शेतामध्ये पिकाच्या धसकटे , अवशेष सध्या जमा करून जाळण्याचे प्रकार दिसत आहेत. तूर हरभरा गहू पिकाचे धसकटे, काड, अवशेष न जाळता ते धुऱ्यावर टाकावे ३ फूट उंचीचा व धुऱ्या एवढा रुंद ढीग करावा आणि त्यावर शेतातील माती टाकावी, येणाऱ्या पावसात ते ओले होऊन रब्बी पिकापर्यंत ते चांगले कुजून जाईल, ते उत्तम सेंद्रिय खत आपण रब्बी पिकाकरिता वापरावे, जमिनीचा कस , पोत त्यामुळे सुधारून जमिनीची उत्पादन क्षमता, वाढेल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांनी केले आहे. अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सेंद्रिय कर्ब वाढून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन कृषी सहाय्यक अमोल हिसेकार व मंडळ कृषी अधिकारी शिवाजी अंभोरे यांनी केले आहे .