उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST2021-09-25T04:45:40+5:302021-09-25T04:45:40+5:30

.................. स्वयंरोजगारविषयी मोफत ‘ वेबिनार ’ वाशिम : युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मार्फत ‘ स्वयंरोजगार सुरु ...

Appeal to participate in the initiative | उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

..................

स्वयंरोजगारविषयी मोफत ‘ वेबिनार ’

वाशिम : युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मार्फत ‘ स्वयंरोजगार सुरु करताना कोणती काळजी घ्याल? ’, या विषयावर शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी ‘ वेबिनार ’ घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. युवक-युवती त्यात सहभागी झाल्या, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी दिली.

................

प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू

वाशिम : शासनाने कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मितीवर व वापरावर बंदी लादली ; मात्र कारवाईबाबत प्रशासन उदासीन असून शहर परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे.

...............

शहरांतर्गत रस्ता कामांना सुरूवात

वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व काही रस्त्यांच्या नूतनीकरणास सुरूवात झालेली आहे. यासह पेवर ब्लाॅक बसविण्याची कामेही हाती घेण्यात आली आहेत. यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.

...............

भाजीपाल्याच्या दरात विक्रमी घसरण

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याच्या दरात विक्रमी घसरण झालेली आहे. शुक्रवारी फुलकोबी, पत्ताकोबी, टमाटर, दोडकी, वांगी, पालक, मेथी, कोथिंबीरचे दर किलोमागे १० ते १५ रुपयांनी कमी झाल्याचे पाहावयास मिळाले.

Web Title: Appeal to participate in the initiative