शिबिरात सहभागी हाेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:32+5:302021-07-10T04:28:32+5:30

------- ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या रक्तदान मोहिमेत ड्रीमलँड सिटी, मंत्री पार्क, सारडा लेआऊट व श्यामपुष्प नगरमधील नागरिक व कोचिंग क्लास ...

Appeal to participate in the camp | शिबिरात सहभागी हाेण्याचे आवाहन

शिबिरात सहभागी हाेण्याचे आवाहन

-------

‘लोकमत’ने हाती घेतलेल्या रक्तदान मोहिमेत ड्रीमलँड सिटी, मंत्री पार्क, सारडा लेआऊट व श्यामपुष्प नगरमधील नागरिक व कोचिंग क्लास संघटनेचे पदाधिकारी, सदस्य सहभागी होणार आहेत.

- प्रा. पंकजकुमार बांडे,

राज्य उपाध्यक्ष,

कोचिंग क्लासेस असोसिएशन

-------

‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेत समाजातील प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. आम्ही कोचिंग क्लासेस असोसिएनच्यावतीने ११ जुलैला शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये प्रत्येकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान करावे.

प्रा. गोपाल वांडे,

पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष,

कोचिंग क्लासेस असोसिएशन

-----------

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करणे अपेक्षित आहे. रक्तदानासाठी ‘लोकमत’ने घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. आपण सर्वांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा.

प्रा. अतुल वाळले,

वाशिम जिल्हा अध्यक्ष,

कोचिंग क्लासेस असोसिएशन

---------

‘लोकमतने’ रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमात आम्ही जास्तीत-जास्त विद्यार्थी व प्राध्यापक सहभाग नोंदवणार आहोत. आपणही रक्तदान करुन या मोहिमेला यशस्वी करावे.

- प्रा. दिलीप महाले,

वाशिम तालुका अध्यक्ष,

कोचिंग क्लासेस असोसिएशन

Web Title: Appeal to participate in the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.