शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाण्यांचा आग्रह न धरण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST2021-05-30T04:30:56+5:302021-05-30T04:30:56+5:30
२८ मे रोजी गुणवत्ता नियंत्रण पथकामार्फत मानोरा तालुक्यातील कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता महाबीज व्यतिरिक्त इतर कंपनीचे २०६५ ...

शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाण्यांचा आग्रह न धरण्याचे आवाहन
२८ मे रोजी गुणवत्ता नियंत्रण पथकामार्फत मानोरा तालुक्यातील कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता महाबीज व्यतिरिक्त इतर कंपनीचे २०६५ क्विंटल सोयाबीन बियाणे शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी विशिष्ट कंपनीच्या बियाण्याचा आग्रह न धरता उपलब्ध बियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी अधिकारी यांनी केले आहे. महाबीज व्यतिरिक्त तालुक्यात इतर १८ कंपन्यांचे २७९८ क्विंटल बियाणे पुरवठा झालेला होता. त्यापैकी ७३३ क्विंटल बियाणे विक्री झाली असून २०६५ क्विंटल बियाणे शिल्लक आहे. तसेच महाबीज कंपनीच्या जे. ऐस. ३२५ च्या बियाण्याचा तालुक्यात ७५७ क्विंटल पुरवठा झाला होता. त्यापैकी जवळपास सर्वच बियाणे संपले आहे. फक्त खरेदी-विक्री संघाकडे अल्प प्रमाणात बियाणे शिल्लक असल्याची माहिती खरेदी-विक्री संघाचे सचिव संदीपान इंगळे यांनी दिली. तरी शेतकऱ्यांनी विशिष्ट कंपनीच्या बियाण्याचा आग्रह न धरता उपलब्ध असलेले बियाणे खरेदी करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी के. डी. सोनटक्के व पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. एस. मकासरे यांनी केले आहे.