पर्यावरण पूरक गुढीपाडवा साजरा करण्याचे चिमुकल्यांचे आवाहन
By Admin | Updated: March 27, 2017 16:39 IST2017-03-27T16:39:00+5:302017-03-27T16:39:00+5:30
हिंदु पंचागाप्रमाणे नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा या सणाचे आणि कडुनिंबाचे अटुत नाते आहे.

पर्यावरण पूरक गुढीपाडवा साजरा करण्याचे चिमुकल्यांचे आवाहन
वाशिम : गुढीपाडव्याला गुढीसोबतच कडुनिबांची निव्वळ पाने न लावता कडुनिबांच्या बालस्वरुची पुजा करुन नंतर पावसाळ्यात त्याची योग्य त्या ठिकाणी लागवड केल्यास प्रथेसोबतच आपल्या पुर्वजांच्या उद्देशाचे पालनही होईल असे आवाहन राष्ट्रीय हरित सनेच्या चिमुकल्यांच्यावतिने केल्या जात आहे.
हिंदु पंचागाप्रमाणे नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा या सणाचे आणि कडुनिंबाचे अटुत नाते आहे. भारतात कडुनिंब हा वृक्ष दैवीवृक्ष ,रोगनिवारक, निसर्गाचा दवाखाना म्हणून मानला जातो. चरख आणि सुश्रुुत या शल्य विशारदांनी यांचे औषधी व पथ्यासंबंधी महत्व जाणले होते. पदम पुराणामध्ये दिर्घयुष्य देणारा वृक्ष म्हणून याची ओळख आहे.हा वृक्ष बागेत किंवा घरासमोर लावला असता कुटूंबास कल्याणकारी दाता असे नमुद केले आहे. फक्त आयुर्वेदात नव्हे तर युनानी औषधी प्रचार पध्दतीतही कडुनिबांचा वापर केला जातो. कडुनिबांची पाने , फळे, फुले, साल, गोंद असे सर्वच भाग औषधीयुक्त आहेत. कफ, वित्तदोष निवारक, त्वाचारोग, संधीवात, मुळव्याध, मुत्रदोघ इत्यादीत उपयुक्त असून कृतीनाशक, कुष्ठरोग, सौंदर्य प्रसाधने असे त्याचे एक ना अनेक उपयोग आहेत. म्हणून कडुनिंब संवर्धनाचे महत्व लोकांनी जाणुन घ्यावे व गुढीपाडव्याला गुढीसोबतच कडुनिबांची निव्वळ पाने न लावता कडुनिबांच्या बालस्वरुची पुजा करुन नंतर पावसाळ्यात त्याची योग्य त्या ठिकाणी लागवड केल्यास प्रथेसोबतच आपल्या पुर्वजांच्या उद्देशाचे पालनही होईल असे आवाहन राष्ट्रीय हरित सनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी, प्राचार्य मिना उबगडे, राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.मिना उबगडे होत्या. सदर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रणीता हरसुले होत्या.मान्यवरांचे हस्ते कडुनिबांचा वृक्षाचे वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी हरित सेनेचे विद्यार्थी आदित्य काळे, श्रृती चव्हाण, मानसी जगताप, कोमल श्ंिदे, नेहा बोरकर, तन्वी चोपडे, प्रिया कव्हर, मोनिका खानझोडे,भाग्यश्री बेलोकार, आरती वाझुळकर, नकुल महाले, राहूल सहांनी, कुणाल खांबलकर, यश खंडारे, यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.