बाजारपेठेतील गर्दी टाळण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:35+5:302021-07-10T04:28:35+5:30
............ कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले वाशिम : गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाकडून आरटीपीसीआर, ॲंटिजन चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. कोरोना ...

बाजारपेठेतील गर्दी टाळण्याचे आवाहन
............
कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटले
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाकडून आरटीपीसीआर, ॲंटिजन चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येत आहे.
...............
पुसद नाक्यावरील वाहतूक ठप्प
वाशिम : शहरातील पुसद नाक्यावर शुक्रवारी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे गेट बंद असल्याने हा प्रकार उद्भवला होता. यामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
................
पाणीपुरवठा योजनांचे देयक अदा करा
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनांचे कोट्यवधी रुपयांचे विद्युत देयक थकीत आहे. ग्रामपंचायतींनी देयक अदा करावे, असे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी.बी. चव्हाण यांनी केले.
.............
रोहयो घोटाळ्याच्या तपासाकडे दुर्लक्ष
मालेगाव : तालुक्यातील मारसूळ येथे रोहयोच्या कामात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी १४ आरोपींवर गुन्हे दाखल झाले ; मात्र या प्रकरणाचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असून बहुतांश आरोपी अद्याप हाती लागलेले नाहीत.
..................
बसस्थानकात मिळेना पिण्याचे पाणी
वाशिम : स्थानिक बसस्थानकात पिण्याच्या शुद्ध पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. यामुळे प्रवाशी वैतागले आहेत. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी महेश धोंगडे यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.
.............
दंडाच्या धास्तीने बंद होताहेत दुकाने
अनसिंग : कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यानंतर दुकान सुरू असल्यास दंड केला जात आहे. या धास्तीने दुकाने वेळेत बंद होत असल्याचे दिसत आहे.