गायरानात पेरणीवरुन अँट्रॉसिटीचा गुन्हा
By Admin | Updated: July 7, 2014 23:52 IST2014-07-07T23:52:22+5:302014-07-07T23:52:22+5:30
सरकारी गायरान जमिन वहिती करण्यासाठी गेलेल्या एका इसमाची १९ ग्रामस्थांनी संगनमत करून अडवणूक केली व जातीवाचक शिवीगाळ केली.

गायरानात पेरणीवरुन अँट्रॉसिटीचा गुन्हा
वाशिम : सरकारी गायरान जमिन वहिती करण्यासाठी गेलेल्या एका इसमाची १९ ग्रामस्थांनी संगनमत करून अडवणूक केली व जातीवाचक शिवीगाळ केली. या कारणावरून पोलिसांनी १९ जणांविरूध्द भादंविचे कलम १४३, १४७, ५0४, ५0६ व यासह ३(१)(१0) अँट्रॉसिटी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. ही घटना ५ जुलै रोजी घडली असुन ६ जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. वाशिम तालुक्यातील गणेशपुर येथील शेतकरी देवानंद शंकर धबाले हे ५ जुलै रोजी सरकारी जमीनीवर पेरणी करत होते. यावेळी गावामधील १९ लोकांनी संगनमत करून पेरणी थांबवून जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय जातीवाचक शिवीगाळ केली. पोलिसांनी १९ जणांविरूध्द भादंविचे कलम १४३, १४७, ५0४, ५0६ व यासह ३(१)(१0) अँट्रॉसिटी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. यामध्ये दत्ता कालवे, साहेबराव कावरखे, भगवान कालवे, नामदेव सदाशिव, श्यामराव वाबळे, प्रल्हाद कालवे, चंद्रभान कालवे, परमेश्वर गिरी, अशोक कावरखे, शंकर कालवे, शंकर कावरखे, शिवाजी कावरखे, विठ्ठल वायचाळ, कैलास वायचाळ, हनुमान वायचाळ, संतोष कालवे, कैलास कालवे, किशोर कालवे, गोपाल खिल्लारी यांचा समावेश आहे. सदर घटनेत वहिती करणार्या इसमास गावातील लोकांनी जमाव करुन एकत्र येत अडवणूक करण्याचा प्रयत्न केला .त्यामुळे गावात शांतताभंगग होण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेत याप्रकरणी १९ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अनिकेत भारती करीत आहेत.