शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

वाशिममध्ये निघाली व्यसनविरोधी रॅली : ‘महाराष्ट्र अंनिस’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:20 IST

वाशिम: महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने शनिवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातून व्यसनविरोधी रॅली काढण्यात आली. प्रारंभी शहरातील महिला व सामाजीक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दारुच्या प्रतिकात्मक बाटलीला चपलांचा हार घालून समाजातील प्रत्येकाने व्यसनांपासून परावृत्त होण्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर मानसोेपचार तज्ञ डॉ. नरेश इंगळे, डॉ. मंजुश्री जांभरुणकर, डॉ. विक्रम चौधरी, ...

ठळक मुद्देदारुच्या प्रतिकात्मक बाटलीला चपलांचा हार घालून समाजातील प्रत्येकाने व्यसनांपासून परावृत्त होण्याचा संदेश देण्यात आला. महात्मा फुले कला, क्रीडा व शिक्षण बहुउद्देशिय संस्था, उमरा शमशोद्दीनच्या कलापथकांनी व्यसनविरोधी गिते व पथनाट्य सादर करुन प्रबोधन केले. रॅलीचा समारोप डॉ. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन करण्यात आला.

वाशिम: महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने शनिवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातून व्यसनविरोधी रॅली काढण्यात आली. प्रारंभी शहरातील महिला व सामाजीक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दारुच्या प्रतिकात्मक बाटलीला चपलांचा हार घालून समाजातील प्रत्येकाने व्यसनांपासून परावृत्त होण्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर मानसोेपचार तज्ञ डॉ. नरेश इंगळे, डॉ. मंजुश्री जांभरुणकर, डॉ. विक्रम चौधरी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी बाळासाहेब बोराडे, समाजकल्याण निरिक्षक केवलकुमार बिजवे, पोलीस निरिक्षक जगदाळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला मार्गस्थ केले. रॅलीत महात्मा फुले कला, क्रीडा व शिक्षण बहुउद्देशिय संस्था, उमरा शमशोद्दीनच्या कलापथकांनी व्यसनविरोधी गिते व पथनाट्य सादर करुन प्रबोधन केले. श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्याथीर्नींनी व्यसनविरोधी पत्रके वाटून जनतेला व्यसनाच्या आहारी न जाण्याचा संदेश दिला. रॅलीचा समारोप डॉ. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन करण्यात आला. यावेळी नागार्जुन बौध्द अल्पसंख्यांक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने रॅलीत सहभागी सर्व कलावंत मंडळींना प्रमाणपत्र व पदक देवून गौरविण्यात आले. यावेळी युवा शाहीर संतोष खडसे, जनार्धन भालेराव, सुभाष सावळे, सुनिल सावळे, गाडगेबाबांच्या भूमिकेत दत्ता वानखेडे, शाहीर नामदेव दिपके, महिलेच्या भूमिकेत अमोल वानखेडे, संजय सुरडकर, गजानन खडसे, काशीराम खडसे, समाधान भगत, शंकर गवळी, सदानंद इंगोले, प्रकाश खडसे, असीत खडसे, साहेबराव पडघान, पंढरीनाथ दवने, सुभाष इंगोले, समाधान सावंत, क्रांती कातडे, धनराज गुडदे, दत्तराव मोरे, चोखाजी इंगोले आदी कलावंतांनी विविध कला व वेषभुषा सादर करुन व्यसनविरोधी गीत व पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाला प्रा. अशोक वाघ, प्रा. अतुल राऊत, प्रा.डी.एस. अंभोरे, डॉ. विक्रम चौधरी, प्रा.यू.एस. जमधाडे, विनोद पट्टेबहादुर, प्रा. उन्मेश घुगे, प्रविण पट्टेबहादुर आदींचे मार्गदर्शन लाभले. रॅलीचे संयोजन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे पी.एस. खंदारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागार्जून संस्थेच्या अध्यक्ष कुसुम सोनुने, दत्तराव वानखेडे, समाधान सावंत, क्रांती कातडे, धनराज गुडदे, सुभाष इंगोले आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिम