जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:34 IST2021-01-14T04:34:06+5:302021-01-14T04:34:06+5:30

जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. बुधवारी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. तसेच ११ ...

Another death in the district | जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू

जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू

जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. बुधवारी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. तसेच ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील पाटणी चौक येथील १, सिव्हिल लाइन्स परिसरातील २, आर. ए. कॉलेज जवळील १, रिसोड शहरातील २, मालेगाव तालुक्यातील पिंपळा येथील १, मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील १, इतर ठिकाणच्या २, गोगरी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,८१५ वर पोहोचला आहे. बुधवारी आठ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत ६५५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर १५२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ११० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Another death in the district