आणखी एक कोरोनामुक्त; एक पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:47 IST2021-08-13T04:47:19+5:302021-08-13T04:47:19+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...

Another corona-free; A positive! | आणखी एक कोरोनामुक्त; एक पॉझिटिव्ह!

आणखी एक कोरोनामुक्त; एक पॉझिटिव्ह!

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी नव्याने एक रुग्ण आढळून आला तर, एकाने कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आला. वाशीम तालु्क्याचा अपवाद वगळता उर्वरित पाच तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,६८१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर, आतापर्यंंत ६३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

००००

पाच तालुके निरंक

गुरुवारच्या अहवालानुसार मानोरा, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर व कारंजा या पाच तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

०००००००

१२ सक्रिय रुग्ण

गुरुवारच्या अहवालानुसार नव्याने एक रुग्ण आढळून आला तर, एकाने कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १२ रुग्ण सक्रिय आहेत.

Web Title: Another corona-free; A positive!