आणखी एका आरोपीस अटक

By Admin | Updated: October 7, 2014 01:08 IST2014-10-07T01:08:03+5:302014-10-07T01:08:03+5:30

मानोरा तालुक्यातील खूनप्रकरण, मुख्य आरोपी अद्यापही फरार.

Another accused arrested | आणखी एका आरोपीस अटक

आणखी एका आरोपीस अटक

मानोरा (वाशिम): तालुक्यात खळबळ उडवून देणार्‍या माया खैरे खुन प्रकरणात आणखी एका आरो पीस पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपी महिला असून, विशाखा शिवराज ढोके (४५) असे तिचे नाव असून, ती दारव्हा तालुक्यातील नांदगव्हाण येथील असल्याचे कळले आहे.
गत २२ सप्टेंबर रोजी गुणमाळ टेकडीजवळ माया खैरेचा जळालेल्या स्थितीमधील मृतदेह आढळल्यानंतर संपुर्ण मानोरा तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने त पासाची चक्रे फिरवून एका आरोपीस अटकही केली होती. शनिवार ४ ऑक्टोबर रोजली पोलिसांनी आणखी एक आरोपी विशाखा ढोके हीला पोलिसांनी वर्धा जिल्हय़ाच्या हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथून अटक केली. विशाखा ढोके ही या प्रकरणातील मुख्य आरोपी मृतक माया खैरेचा पती योगेश खैरे याची सासू आहे.
आपल्या मुलीचा संसार उद्धस्त होऊ नये म्हणून आपण हे कृत्य केल्याचे तिने कबुल केले आहे. या प्रकरणातील दोन आरोपी योगेश खैरे आणि अर्जुन नामदेव भालेराव हे अद्यापही फरार आहेत.

Web Title: Another accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.