जिल्ह्यात आणखी २१ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:41 IST2021-01-23T04:41:33+5:302021-01-23T04:41:33+5:30

नव्या रुग्णांमध्ये वाशिम शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १, सुंदरवाटिका येथील १, काळे फाईल परिसरातील १, प्रथमेश ले-आउट परिसरातील १, ...

Another 21 corona affected in the district | जिल्ह्यात आणखी २१ कोरोना बाधित

जिल्ह्यात आणखी २१ कोरोना बाधित

नव्या रुग्णांमध्ये वाशिम शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १, सुंदरवाटिका येथील १, काळे फाईल परिसरातील १, प्रथमेश ले-आउट परिसरातील १, आययूडीपी कॉलनी परिसरातील २, शुक्रवार पेठ येथील १, दत्तनगर येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, तोरणाळा येथील १, मालेगाव तालुक्यातील कवरदरी येथील १, किन्हीराजा येथील १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील सुपर कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, वरुड येथील १, मानोरा तालुक्यातील दापुरा येथील १, इंझोरी येथील १ आणि कारंजा शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच जिल्ह्याबाहेर एका कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. उपचार घेत असलेल्या ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता ६,९७७ झाला आहे. कोरोनामुळे १५२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, १६२ जणांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Another 21 corona affected in the district