जिल्ह्यात आणखी १८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:46 IST2021-01-13T05:46:02+5:302021-01-13T05:46:02+5:30

जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. मंगळवारी १८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील ...

Another 18 corona positive in the district | जिल्ह्यात आणखी १८ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आणखी १८ कोरोना पॉझिटिव्ह

जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. मंगळवारी १८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील २, वाळकी येथील १, मालेगाव तालुक्यातील वसारी येथील १, राजुरा येथील १, शिरपूर येथील १, बोराळा येथील २, करंजी येथील १, ढोरखेडा येथील १, कळंबेश्वर येथील १, मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील १, रिसोड शहरातील १, व्याड येथील १, वनोजा येथील १, मोप येथील १, चिंचाबा येथील १, जांब येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,८०३ वर पोहोचला आहे. मंगळवारी १३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक स्थळी गर्दी करू नये, घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००

१०७ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत ६,८०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,५४४ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Another 18 corona positive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.