आणखी १२५ पाॅझिटिव्ह; १८३ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:14+5:302021-03-13T05:15:14+5:30

गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी आणखी १२५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये ...

Another 125 positive; 183 people defeated Corona | आणखी १२५ पाॅझिटिव्ह; १८३ जणांची कोरोनावर मात

आणखी १२५ पाॅझिटिव्ह; १८३ जणांची कोरोनावर मात

गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी आणखी १२५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील नवीन आययूडीपी कॉलनी १, शुक्रवार पेठ-२, सिव्हील लाइन्स १, हिंगोली रोड परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, अंबिकानगर १, सामान्य रुग्णालय परिसर १, आययूडीपी कॉलनी २, कोषागार कार्यालयाजवळील १, व्यंकटेश कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, घोटा १, काटा २, तोंडगाव २, आडगाव १, गोंडेगाव येथील १, वाघजाळी १, अनसिंग येथील २, कृष्णा ४, रिसोड शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसर १, शहरातील इतर ठिकाणचा १, कवठा १, भर येथील १, येवता येथील १, केनवड ३, मानोरा शहरातील २, गादेगाव १, चिस्ताळा २, साखरडोह येथील १, कुपटा १, सोमठाणा येथील १, वाईगौळ येथील २, धावंडा १, पोहरादेवी १, मालेगाव शहरातील ६, डही येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, किन्हीराजा येथील १, शिरपूर येथील ३, मंगरूळपीर शहरातील संभाजीनगर येथील ३, बायपास परिसरातील १, शिवाजीनगर येथील १, राजस्थान चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, लाठी २, शेलूबाजार ३, चिखली १, पेडगाव ५, सोनखास ३, नवीन सोनखास २, वनोजा येथील २, गिंभा १, मोहरी १, पिंपळगाव १, सनगाव येथील १, कासोळा २, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प १, तुळजा भवानी मंगल कार्यालय परिसरातील १, पंचायत समिती परिसरातील १, कामाक्षी माता मंदिर परिसरातील १, वाल्मीकीनगर येथील ४, नागोबा मंदिर परिसरातील १, गुरुमंदिर परिसरातील १, रामदेवबाबा मंदिर परिसरातील १, कीर्तीनगर १, संभाजीनगर १, शिवाजीनगर १, गुरुमंदिर रोड परिसरातील १, निंभा ५, लोहारा १, उंबर्डा ३, सुकळी येथील १, धामणी १, वीरगव्हाण येथील १, कामरगाव ३, कुपटी १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून १८३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १० हजार ७१२ वर पोहोचला असून, आतापर्यंत ९३२२ जणांनी कोरोनावर मात केली, तर १६३ जणांचा मृत्यू झाला.

००००

१२२६ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत १०,७१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ९,३२२ जणांनी कोरोनावर मात केली, तर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १,२२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Another 125 positive; 183 people defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.