जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:35 IST2021-02-08T04:35:43+5:302021-02-08T04:35:43+5:30

फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. रविवारी (दि.७) एकूण १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. ...

Another 12 corona positive in the district | जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पाॅझिटिव्ह

फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. रविवारी (दि.७) एकूण १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हिल लाइन येथील १, फकीम अलीनगर येथील १, भगवती परिसरातील १, गुलाटी बिल्डिंग परिसरातील १, रिसोड शहरातील आंबेडकरनगर येथील २, देशमुख गल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, केनवड येथील १, मालेगाव शहरातील १, कारंजा शहरातील प्रशांतनगर येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,२३५ वर पोहोचला आहे. रविवारी १५ जणांना रुग्णालयातून सुटी झाली. आतापर्यंत ६,९५१ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या १२८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Another 12 corona positive in the district