जिल्ह्यात आणखी ११ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:32 IST2021-01-10T04:32:00+5:302021-01-10T04:32:00+5:30
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. शनिवारी नऊ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील गणेश ...

जिल्ह्यात आणखी ११ कोरोना पॉझिटिव्ह
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. शनिवारी नऊ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील गणेश पेठ येथील १, ग्रीन पार्क कॉलनी परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, केकतउमरा येथील २, रिसोड शहरातील शिवाजी चौक परिसरातील १, भोकरखेडा येथील १, मंगरुळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, शेलूबाजार येथील २, मोहरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,७५६ वर पोहोचला आहे.
०००
९९ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,७५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,५०५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे ९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.