जिल्ह्यात आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:46+5:302021-02-05T09:28:46+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी मेडशी (ता. मालेगाव) येथे आढळून आला होता. अलीकडच्या काळात कोरोनाबाधितांच्या संख्येत ...

जिल्ह्यात आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी मेडशी (ता. मालेगाव) येथे आढळून आला होता. अलीकडच्या काळात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. सोमवारी, १० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील मानमोठे नगर येथील १, देवपेठ येथील १, मालेगाव शहरातील २, मंगरूळपीर शहरातील ४, कारंजा शहरातील वनदेवीनगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी आरोग्य विभागातर्फे केली जात आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,१५४ वर पोहोचला आहे. सोमवारी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
००
१५४ जणांवर उपचार
आतापर्यंत ७,१५४ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,८५९ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.