पाच सेवा सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: February 3, 2015 00:01 IST2015-02-03T00:01:31+5:302015-02-03T00:01:31+5:30
वाशिम तालुक्यातील ‘क’ वर्गीकृत पाच सेवा सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.

पाच सेवा सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
वाशिम : वाशिम तालुक्यातील ह्यकह्ण वर्गीकृत पाच सेवा सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केला आहे. यामुळे राजकीय रणधुमाळी सुरू होत आहे. सेवा सहकारी संस्था र्मयादित चिखली बु., सेवा सहकारी संस्था र्मयादित बाभूळगाव, सेवा सहकारी संस्था र्मयादित कापशी उकळी, सेवा सहकारी संस्था र्मयादित एकांबा व सेवा सहकारी संस्था र्मयादित आडगाव या संस्थांची निवडणुक होत आहे. किनखेडा : रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील सेवा सहकारी संस्थेच्या १३ जागांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १३ अर्ज आले. परिणामी निवडणूक अविरोध होणार असून, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.