अखिल भारतीय तांडा सुधार समितीची कार्यकारिणी घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:40 IST2021-04-25T04:40:31+5:302021-04-25T04:40:31+5:30
वाशिम : मागील तीस वर्षांपासून बंजारा समाजाच्याच नव्हे तर विमुक्त-भटक्यांसकट संपूर्ण मानवजातीच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय तांडा सुधार ...

अखिल भारतीय तांडा सुधार समितीची कार्यकारिणी घोषित
वाशिम : मागील तीस वर्षांपासून बंजारा समाजाच्याच नव्हे तर विमुक्त-भटक्यांसकट संपूर्ण मानवजातीच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची ऑनलाइन सभा २४ एप्रिल २०२१ रोजी संपन्न झाली. अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेत अखिल भारतीय तांडा सुधार समितीची राज्यस्तरीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी वाशिम येथील डॉ. विजय जाधव यांची वर्णी लागली.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, बुवाबाजी या गोष्टी समाजाला विकासापासून कोसोदूर नेत आहेत. त्यामुळे समाजाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाकरिता विज्ञानवादी मंडळींनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांनी मांडले. अ. भा. तांडा सुधार समिती ही परिवर्तनवादी व बुद्धिप्रामाण्यवादी विचाराची संघटना आहे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षपदी डॉ. विजय जाधव, वाशिम, कार्याध्यक्ष श्रीपत राठोड नागपूर, उपाध्यक्ष योगेश्वर राठोड चाळीसगाव, पंतुसिंग राठोड वर्धा, महासचिव श्रावण जाधव मालेगाव, सचिव सुभाष चव्हाण रामटेक, सहसचिव रमेश पवार अकोला यांच्यासह कार्यकारिणीत अनेकांचा समावेश आहे. महिला आघाडी प्रमुख कविता राठोड यवतमाळ व अरुणा जाधव वाशिम यांचा समावेश आहे.