बालाजी संस्थानचा वार्षिकोत्सव

By Admin | Updated: September 26, 2014 00:26 IST2014-09-26T00:26:36+5:302014-09-26T00:26:36+5:30

वाशिम येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन, ६ ऑक्टोबरला महाप्रसाद.

Anniversary of Balaji Institute | बालाजी संस्थानचा वार्षिकोत्सव

बालाजी संस्थानचा वार्षिकोत्सव

वाशिम : स्थानिक बालाजी संस्थानच्यावतीने बालाजी मंदिरामध्ये शुक्रवार २६ सप्टेंबर ते गुरुवार ९ ऑक्टोबर या दरम्यान वार्षिकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वार्षिकोत्सव उत्सवात ध्वजरोहण, कीर्तन, प्रवचन, भजन, रथोत्सव, गायन, श्रींची पालखी सोहळा, महाप्रसाद व गोपालकाला इत्यादी कार्यक्रम पार पडणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी सहभाग घेवून उत्सव शोभिवंत करावा, असे आवाहन बालाजी संस्थाचे वहिवाटदार विश्‍वस्त ज्ञा.ना. काळू यांनी केले आहे. चित्रा नक्षत्राकर श्री लक्ष्मी व्यंकटेशाचे नवरात्र प्रारंभानिमित्त ध्वजारोहनाने या उत्सवाची सुरुवात करण्यात येणार आहे.

Web Title: Anniversary of Balaji Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.