कारंजालाड येथील शिक्षकाची अफलातून अंकलिपी

By Admin | Updated: September 4, 2014 22:59 IST2014-09-04T22:59:54+5:302014-09-04T22:59:54+5:30

कारंजालाड येथील शिक्षकाने एक अफलातून अंकलिपी तयार केली आहे.

Ankleblue teacher from Karanzalad | कारंजालाड येथील शिक्षकाची अफलातून अंकलिपी

कारंजालाड येथील शिक्षकाची अफलातून अंकलिपी

कारंजालाड येथील रहिवासी शिक्षक संतोष वसंतराव मापारे यांनी विद्यार्थ्यांंना अभ्यासात रूची निर्माण व्हावी या उद्देशाने एक अफलातून अंकलिपी तयार केली आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे तब्बल १२५ विद्यार्थ्यांंची अभ्यासात रूची वाढली आहे.
शिक्षक मापारे हे वाशिम तालुक्यातील बाभूळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर मागील ६ वर्षापासून कार्यरत आहेत. बाभूळगावची लोकसंख्या अंदाजे २ हजार असून, गोपाळ समाज बांधवाची वस्ती म्हणून हे गाव परिचित आहे. विद्यार्थ्यांंना नियमित शाळेत पाठविण्याबाबत हा समाज फारसा उत्सूक नाही. विद्यार्थ्यांंचेही शिक्षणात मन रमत नाही, हे लक्षात आल्यानंतर मापारेंनी स्वत: एक अफलातून अंकलिपी तयार केली. ह्यफळ्यावर १ हा अंक लिहिला की अ, २ अंक लिहिला की आह्ण अशा प्रकारे धडे गिरविण्यास त्यांनी प्रारंभ केला. अल्पावधीतच याचा विद्यार्थ्यांंना फायदा झाला. फळ्यावर गणितीय अंक लिहिताच विद्यार्थी मराठी भाषेत धडा लिहून काढतात इतपत विद्यार्थ्यांंची शैक्षणिक प्रगती झाली आहे.
सध्या स्पर्धेचे युग असून, यामध्ये आपला विद्यार्थी कुठेही कमी पडू नये या दृष्टीने शिक्षक मापारे यांनी वर्गातच विद्यार्थ्यांंचे वेगवेगळे गट पाडले आहे. सदर विद्यार्थ्यांंना सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न दिले जातात व त्यांच्यामध्ये स्पर्धा घेवून विजयी गटास ते प्रोत्साहनपर बक्षीस सुद्धा देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांंंची सामान्य ज्ञानावरची पकड घट्ट होत चालली आहे. तसेच मूकबधिरांच्या ब्रेनलिपीने प्रभावित होवून शिक्षक मापारे यांनी विद्यार्थ्यांंना ह्यहातवारेह्ण करून शिकविण्याचा प्रयत्न चालविला आहे. या प्रयत्नाला विद्यार्थ्यांंंनीही साथ दिली. त्यामुळे अतिशय आवडीने विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवित आहे.

Web Title: Ankleblue teacher from Karanzalad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.