अंनिसचे ‘आत्मक्लेश’ आंदोलन
By Admin | Updated: November 21, 2014 01:06 IST2014-11-21T01:06:40+5:302014-11-21T01:06:40+5:30
रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

अंनिसचे ‘आत्मक्लेश’ आंदोलन
वाशिम : महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी तथा जवळखेड येथील दलित कुटुंबाची हत्या करणार्यांना अटक करण्यात राज्य शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी २0 नोव्हेंबरला स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्वत: रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या दोन्ही घटनेचा निषेध नोंदविला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन तब्बल दीड वर्षाचा कालावधी उलटला असला, तरी त्यांच्या मारेकर्यांना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथील दलित कुटुंबाची निर्घृण हत्या करणारेही अद्याप मोकाट आहेत. या दोन्ही घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर चौकात आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी पी. एस. खंदारे, रामप्रभू सोनोने, बबनराव मोरे, नामदेव दीपके, सदानंद तायडे आदींची उपस्थिती होती.