शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यप्राण्यांचा गाळात फसून जातोय जीव; तीन निलगाईचा बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 16:52 IST

वाशिम: जिल्ह्यातील जंगलात जलस्त्रोत नसताना प्रकल्पांतही आता केवळ गाळ उरला असून, पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजिवांचा या गाळात फसून जीव जात असल्याच्या विदारक घटना जिल्ह्यात घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील जंगलात जलस्त्रोत नसतानाच प्रकल्पांतही आता केवळ गाळ उरला असून, पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजिवांचा या गाळात फसून जीव जात असल्याच्या विदारक घटना जिल्ह्यात घडत आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात अवघ्या महिनाभरात तीन निलगार्इंचा गाळात फसून मृत्यू झाला; परंतु वनविभागाला पंचनाम्याखेरीज काही करता आले नाही. वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचे क्षेत्र लक्षणीय असून, काटेपूर्णा आणि सोहळ काळविट अभयारण्येही जिल्ह्यात आहेत. प्रादेशिक जंगलासह अभयारण्याच्या क्षेत्रात बिबट, अस्वल, तरस, कोल्हा, रानडुक्कर या हिंस्त्र वन्यप्राण्यांसह निलगाय, हरीण, काळविट, माकड, ससा, आदिसारख्या शाकाहारी वन्यजीवांची संख्या लाखाहून अधिक आहे. तथापि, जैवविविधेत अनन्य साधारण महत्त्व असलेल्या या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी तर सोडाच; परंतु संरक्षणासाठीही वनविभागाकडून आवश्यक प्रमाणात कुठल्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. तकलादू उपायांवर भर देण्यात धन्यता मानली जात आहे. वन्यजिवांसाठी सर्वात आवश्यक अशा पाणवठ्यांच्या निर्मितीबाबत कमालीची उदासीनता दिसत आहे. नैसर्गिक जलस्त्रोत आधीच कमी असताना वनविभागाने तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यांत पाणी टाकण्यात येत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील वन्यजिवांचा अधिवास धोक्यात असताना त्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. जंगलात पाणी नसल्याने वन्यजीव शेतशिवार किंवा प्रकल्पांकडे पाण्यासाठी धाव घेत असून, यामुळे त्यांचा जीव संकटात सापडत आहेत. शेतशिवारात कधी विहिरीत पडून, तर कधी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात, तर कधी रस्ता अपघातात जखमी झाल्याने कित्येक वन्यजीवांचे बळी गेले आहेत. आता प्रकल्पांत मृतसाठा उरला असताना या प्रकल्पांवर पाणी पिण्यास जाणारे वन्यजीव गाळात फसून मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. काही ठिकाणी गाळात फसलेल्या वन्यजीवांना वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी बाहेर काढले आहे; परंतु काही ठिकाणी गाळात फसलेल्या वन्यजिवांचा मृत्यू झाल्यानंतरच वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करायला जात असल्याचेही दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात महिनाभरात महिनाभरात तीन निलगाई प्रकल्पाच्या गाळात फसून दगावल्या. त्यात ८ ते १० दिवसांपूर्वी गाळात फसून मृत्यू झालेल्या एका निलगाईचा केवळ सांगाडा उरल्यानंतरच वनविभागाने पंचनामा के ला आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाई