पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित.
By Admin | Updated: April 30, 2015 01:46 IST2015-04-30T01:46:24+5:302015-04-30T01:46:24+5:30
पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक व परिचर यांना माहे जोनवारी २0१५ पासून वेतन मिळाले नाही.

पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित.
वाशिम : वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणार्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक व परिचर यांना माहे जोनवारी २0१५ पासून वेतन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आढावली आहे. रखडलेले वेतन तत्काळ अदा करा, अशी मागणी संबंधित कर्मचार्यांनी २९ एप्रिल रोजी केली. मुक्या प्राण्यांची सेवा करणार्या कर्मचार्यांना जानेवारी २0१५ पासून वेतन मिळालेले नाही; मात्र वरिष्ठ अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. याबाबत संबंधित कर्मचारी पगारासंदर्भात चौकशी करतात; तर तुमच्या पगाराचा पैसाच शासनाने पाठविला नाही, असे उत्तर मिळते. तीन ते चार महिने पगार मिळत नसेल तर आम्ही काय खायचे, असा प्रश्न या कर्मचार्यांनी उपस्थित केला आहे. काही कर्मचारी बाहेरगावचे असल्याने त्यांची गैरसोय होत असून, ते हतबल झाले आहेत. गट विकास अधिकारी आर के तांबे यांनी पशुसंवर्धन विभागातील कर्मचार्यांच्या पगारासाठी पैसे उपलब्ध नसल्याने जानेवारी २0१५ पासून त्यांचा पगार थांबला असल्याचे सांगीतले.