संतप्त शेतक-यांनी मांडला तहसील कार्यालयात ठिय्या!

By Admin | Updated: March 7, 2017 02:43 IST2017-03-07T02:43:09+5:302017-03-07T02:43:09+5:30

नियमानुसार तूर खरेदी, हमीभाव मिळण्याची मागणी

Angry farmer stabbed to tehsil office | संतप्त शेतक-यांनी मांडला तहसील कार्यालयात ठिय्या!

संतप्त शेतक-यांनी मांडला तहसील कार्यालयात ठिय्या!

मालेगाव, दि. ६- नाफेडने नियमानुसार तूर खरेदी करावी, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी सोमवार, ६ मार्च रोजी दुपारी १.३0 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात येथे ठिय्या आंदोलन केले.
बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच दर कमी होण्यास सुरूवात झाली. शेतकर्‍यांना हमीभाव मिळावा, यासाठी केंद्रशासनाच्या आधारभूत किमतीनुसार नाफेडकडून प्रमुख केंद्रांवर तुरीची खरेदी केली जात आहे. हमीभाव व बोनस मिळून तुरीला प्रतिक्विंटल ५0५0 रुपये दर मिळत आहे; परंतु मालेगावात शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍यांचीच अधिक चलती आहे. व्यापार्‍यांनी यंत्रणांशी हातमिळवणी करून त्यांचा माल सरळ व रात्रीच्या वेळी जात असून, शेतकर्‍यांच्या मालाची दोन ते तीन वेळा चाळणी करून १५ ते २0 दिवसांनंतरही नंबर लागत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी मालेगाव तहसील कार्यालयात जाऊन चक्क तहसीलदारांच्या कक्षासमोरच ठिय्या आंदोलन केले.
प्रभारी तहसीलदार राठोड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. यावेळी शेतकरी बाबूराव आढाव, गजानन आढाव, माणिक गालट, कृष्णा घुगे, विलास बोरचाटे, दत्ता शिंदे, प्रल्हाद शिंदे, पिंटू जाधव, अजय इंगोले, गजानन वाझूळकर, गणेश लादे, ओम केनवडकर, कैलास गिर्‍हे, प्रदीप मोरे, श्यामराव जोगदंड, कैलास लहाने, पांडुरंग लहाने उपस्थित होते.

Web Title: Angry farmer stabbed to tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.