अंगणवाडी कर्मचा-यांचा ठिय्या!

By Admin | Updated: August 2, 2016 01:47 IST2016-08-02T01:47:46+5:302016-08-02T01:47:46+5:30

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी सेविका व कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारी ठिय्या दिला.

Anganwadi worker's stance! | अंगणवाडी कर्मचा-यांचा ठिय्या!

अंगणवाडी कर्मचा-यांचा ठिय्या!

वाशिम: विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी सेविका व कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारी ठिय्या दिला. अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन नियमित मिळत नाही, अन्य मानधनही नियमित नाही. यासह अंगणवाडीच्या ठिकाणी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मानधन नियमित मिळावे आणि प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी सोमवारी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी वाशिम शहरातून भव्य मोर्चा काढला तसेच जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Anganwadi worker's stance!