खड्ड्यांचे पूजन करून अनाेखे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:29+5:302021-08-27T04:44:29+5:30
रिसोड ..... येथील वाशिम नाक्यानजिक जीवघेण्या खड्ड्याचे पूजन करून गुलाबाचे फूल लावून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रशासनाप्रती निषेध व्यक्त करण्यात ...

खड्ड्यांचे पूजन करून अनाेखे आंदाेलन
रिसोड ..... येथील वाशिम नाक्यानजिक जीवघेण्या खड्ड्याचे पूजन करून गुलाबाचे फूल लावून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रशासनाप्रती निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तृतीयपंथियांनी टाळ्या वाजून निषेध व्यक्त केला.
रिसोड येथील वाशिम नाक्यानजिक राज्य महामार्गावर खूप मोठा जीवघेणा खड्डा पडला आहे. त्या खड्ड्यांमुळे बरेच अपघात झाले. वंचित बहुजन आघाडी रिसोड शहराच्यावतीने शहराध्यक्ष प्रदीप खंडारे यांच्या नेतृत्वात त्या खड्ड्यात बसून खड्ड्याला हार घालुन, गुलाबाचे फूल, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आली. यावेळी तृतीयपंथी यांनी टाळ्या वाजून या खड्ड्यांचा निषेध नोंदविला. हा खड्डा जर तत्काळ बुजवण्यात आला नाही तर येत्या दोन दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे प्रदीप खंडारे यांनी सांगितले. यावेळी डॉ. रवींद्र मोरे पाटील, विश्वनाथ पारडे, विजय सिरसाठ, अर्जुन डोंगरदिवे, शहर अध्यक्ष प्रदीप खंडारे, दिलीप चोपडे, पिन्टुमामा ठाकरे, विक्की हरकळ, शिवा मुळे, प्रवीण कांबळे, नितीन इंगोले, बबन संभादिडे, वैभव भालेकर व आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.