अनसिंग येथील पशुदवाखाना समस्यांच्या गर्तेत
By Admin | Updated: May 17, 2014 23:13 IST2014-05-17T22:04:35+5:302014-05-17T23:13:10+5:30
अनसिंग येथील पशुदवाखान्यात असुविधा; जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लक्ष देण्याची मागणी.

अनसिंग येथील पशुदवाखाना समस्यांच्या गर्तेत
अनसिंग: येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा वनवास संपता संपेना, अशीच परिस्थिती आहे. भरघोस निधी मंजूर असूनही सुविधा कागदोपत्रीच शोभून दिसत आहे. पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शेतकरी, पशुपालन व्यवसाय करणार्यांवर कुर्हाड कोसळली आहे. या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याची भव्य इमारत व फार मोठी जागा उपलब्ध आहे.परंतु, तेथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. असंख्य समस्यांनी ग्रासलेल्या या दवाखान्याकडे कुठल्याही अधिकार्यांचे लक्ष नाही. या ठिकाणी लसीकरणाबाबत शेतकर्यांना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नाही. या ठिकाणी लॅबची व्यवस्था नाही. गुरांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी उपकरणे उपलब्ध नाहीत. याकडे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लक्ष देण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे. अनसिंग परिसरातील हजारो पशुपालकांकडे गाय, बैल, म्हैस, बकरी आदी जनावरे आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे काही शेतकरी वळत आहेत. त्यामुळे साहजिकच पशुसंवर्धन विभागानेदेखील मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, अनसिंग येथील पशु वैद्यकीय दवाखानाच विविध समस्यांच्या विळख्यात अडकल्याने पशुपालक वार्यावर असल्याचे चित्र आहे. खासगी दवाखान्यात महागडे उपचार करावे लागत आहेत. याकडे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लक्ष देण्याची मागणी परिसरातील पशुपालकांनी केली आहे.