तहानलेल्यांसाठी ‘अमृतधारा’ उपक्रम
By Admin | Updated: April 21, 2017 13:41 IST2017-04-21T13:41:59+5:302017-04-21T13:41:59+5:30
वर्षभर पिण्याचे थंड पाणी मिळावे याकरिता प्रकल्प अमृतधारा अंतर्गंत ठिकठिकाणी पाणपोई, हौद उभारुन ‘अमृतधारा’ उपक्रम राबविल्या जात आहे.

तहानलेल्यांसाठी ‘अमृतधारा’ उपक्रम
वाशिम : उन्हाळयात नागरिकांना थंड पाणी मिळावे यासाठी वाशिम येथील मारवाडी युवा मंचचा दरवर्षीच पुढाकार असतो. यावर्षी पशुपक्ष्यांसह नागरिकांना वर्षभर पिण्याचे थंड पाणी मिळावे याकरिता प्रकल्प अमृतधारा अंतर्गंत ठिकठिकाणी पाणपोई, हौद उभारुन ह्यअमृतधाराह्ण उपक्रम राबविल्या जात आहे.
अखिल भारतीय मारवाड़ी युवा मंच यांची संपूर्ण भारतात ७०० शाखा असून त्यात विविध उपक्रम राबवित असल्यामुळे सर्वोच्चस्थान गाठणारी वाशिम शाखा आहे. कोणताही प्रकल्प असो त्याच्यात काही तरी वेगळेपण जपून आगळी वेगळी समाजसेवा या मंचच्यावतिने केल्या जाते. सद्या उन्हाळयाचे दिवस असल्याने अश्या उन्हात तहानलेल्या मानवाला व पशुधनाला पिण्याचे पाणी मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाशिम नगरित विविध भागात अमृतधारा (पाणपोई) व पशुअमृतधारा (सीमेंट हौद) लावण्यात आले आहे.
याच प्रकल्पाअंतर्गत ठिकठिकाणी १३ अमृतधारा व ३५ हौद पशुअमृतधारा लावण्यात आले आहे. या अमृतधारेत वर्षभर थंड पाणी मिळण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. सदर प्रकल्प शाखा अध्यक्ष मनीष मंत्री, शाखा सचिव संजोगकुमार छाबड़ा, कोषाध्यक्ष उमेद खंडेलवाल यांच्या मागदर्शनाखाली राबविण्यात येतआहे.