शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

अमरावती विभागातील ७२३९ गावांतील खरिपाचा नजरअंदाज जाहीर

By दिनेश पठाडे | Updated: September 30, 2023 12:58 IST

विभागाची हंगामी ६० पैसेवारी, पैसेवारीत पीक स्थिती उत्तम दाखविल्याने नाराजी 

वाशिम : अमरावती महसूल विभागात समाविष्ट असलेल्या त्या-त्या जिल्ह्याने खरीप हंगाम २०२३-२४ ची हंगामी नजरअंदाज  पैसेवारी काढली आहे. त्यानुसार विभागातील ७ हजार २३९ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सर्व गावांची पैसेवारी ५०  पैक्षा अधिक आहे. तर विभागाची एकूण पैसेवारी ६० आहे. 

अमरावतील विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या ७ हजार ४०० एवढी आहे. त्यापैकी लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या ७ हजार २३९ आहे. लागवडी योग्य असलेल्या गावांतील खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पैसेवारी जिल्हास्तरावर काढण्यात आली. विभागात अकोला जिल्ह्याची सर्वात कमी ५७ पैसेवारी तर सर्वाधिक ६२ पैसेवारी ही वाशिम जिल्ह्याची निघाली आहे. विभागात ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिला, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. यामुळे काही जिल्ह्यातील पीक परिस्थिती नाजूक झाली होती. नजरअंदाज हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे गृहित धरून पैसेवारी अधिक निघाल्याचे चित्र आहे.

पावसाच्या दीर्घ खंडामुळे पीक उत्पादनात घट होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोंबरमध्ये सुधारित आणि डिसेंबर महिन्यात काढण्यात येणाऱ्या अंतिम पैसेवारीत बदल करण्याचा वाव असल्याने पैसेवारी कमी निघेल अशी शक्यता आहे.  शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी कोणतेही अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते. ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी आली तर या सर्व बाबींसाठी अनुकूल वातावरण असल्याचे मानले जाते. विभागात प्रमुख पिकांची स्थिती पैसेवारीत उत्तम स्थिती दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.   त्यामुळे विभागातील प्रत्येक जिल्ह्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी काढावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सर्वात कमी पैसेवारी अकोला जिल्ह्याचीअमरावती विभागातील त्या-त्या जिल्ह्याने जाहीर केलेल्या पैसेवारीमध्ये सर्वात कमी पैसेवारी ही अकोला जिल्ह्याची निघाली असल्याचे दिसून येते. या जिल्ह्यातील १०१२ गावांपैकी लागवडी योग्य असलेल्या ९९० गावांची पैसेवारी ५७ एवढी काढण्यात आली आहे. तर सर्वाधिक पैसेवारी वाशिम जिल्ह्याची ६४ पैसेवारी निघाली आहे. अमरावती, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्याची  पैसेवारी अनुक्रमे ६०, ६१ व ६० एवढी आहे. आगामी सुधारित आणि अंतिम पैसेवारीत बदल होण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी