आंबेडकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:40 IST2021-04-15T04:40:03+5:302021-04-15T04:40:03+5:30
स्थानिक आरोग्यवर्धिनी केंद्रात दि. १४ एप्रिल रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...

आंबेडकर जयंती साजरी
स्थानिक आरोग्यवर्धिनी केंद्रात दि. १४ एप्रिल रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. आर. नांदे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमाला मनिष ढगे, योगीराज ढवके, रवी बागडे, रवी धांगड, रामकृष्ण वानखडे, रमेश राठोड, रतनकुमार राऊत यांच्यासह सविता बुरडे, माला पवार, शिरभाते इंगोले, हळदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रहीम लालुवाले, आशिष, सुभाष जामनिक आदींनी परिश्रम घेतले.