आराेग्य सेवेसाठी सदैव तत्पर : भावना गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST2021-07-16T04:27:59+5:302021-07-16T04:27:59+5:30

सोमवारी स्त्री रुग्णालयाला खासदार गवळी यांच्या हस्ते व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी कोणतेही मेडिकल साहित्य लागल्यास आपण सदैव आरोग्य ...

Always ready for health care: Emotions are gone | आराेग्य सेवेसाठी सदैव तत्पर : भावना गवळी

आराेग्य सेवेसाठी सदैव तत्पर : भावना गवळी

सोमवारी स्त्री रुग्णालयाला खासदार गवळी यांच्या हस्ते व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी कोणतेही मेडिकल साहित्य लागल्यास आपण सदैव आरोग्य सेवेसाठी तत्पर आहोत असे त्या म्हणाल्या. रुग्णालयाच्या आवारात खासदार गवळी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजसिंग पवार, ॲड. शामराव उंडाळ, डॉ. विवेक साबू, डॉ. थोरात, डॉ. अनिल कावरखे, डॉ. हरीष बाहेती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, डॉ. राम हजारे, डॉ. अमित बिडवे, नगरसेवक ॲड. विनोद खंडेलवाल, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, युवा सेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, नारायण ठेंगडे, रवी गोरे, रेखा घुले, सहायक अधिसेविका उषा भोसले, औषध निर्माण अधिकारी विशाल काकडे, जिल्हा आरोग्य ड्रेसर शेख वसीम उपस्थित होते.

Web Title: Always ready for health care: Emotions are gone