शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

इंधन दरवाढीचा फटका; ऑटोरिक्षाचालकांवर पर्यायी रोजगाराची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:14 IST

Washim News अपेक्षित कमाई होत नसल्याने अनेकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पर्यायी रोजगार शोधले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   गेल्या चार महिन्यांत पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असून, पेट्रोलचे दर ९५ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचे दर ८३ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. या इंधन दरवाढीचा फटका ऑटोरिक्षा चालविणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अपेक्षित कमाई होत नसल्याने अनेकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पर्यायी रोजगार शोधले आहेत.वाशिम जिल्ह्यात रोजगाराची समस्या गंभीर आहे. उद्योगांची वाणवा असल्याने ५० टक्क्यांहून अधिक कामगारांना शेतीकामाचा आधार घ्यावा लागतो, तर हजारो लोक ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दिवसभर बसस्थानक, शहरांतील मुख्य चौकात तासन्तास प्रवाशांची वाट पाहणे किंवा ग्रामीण भागांत नियमानुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी ऑटोरिक्षाचालकांची मोठी धडपड होत असल्याचे चित्र दरदिवशी पाहायला मिळते. त्यात कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊन काळात ऑटोरिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. आता तो सुरळीत होण्यापूर्वीच शासनाकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ केली जात आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना पूर्वीच्या दरात प्रवाशांची वाहतूक करणेच परवडणारे राहिले नाही. जिल्ह्यात ऑटोरिक्षांची संख्या ७६९० झाल्याने प्रवासी मिळणे कठीण होते. त्यामुळे या रिक्षाचालकांना आता ऑटोरिक्षा चालविणेच कठीण झाले आहे. दिवसभर ऑटो फिरवून २०० रुपयेसुद्धा कमाई होत नसल्याने अनेकांनी पर्यायी रोजगार शोधले आहेत. त्यात काहींनी भाजीपाला विक्रीचा व्यवसायही सुरू केला आहे.

दरवाढीमुळे व्यवसाय कठीणबसस्थानकाहून जवळपास एक, दोन किलोमीटरच्या अंतरासाठी प्रतिप्रवासी दहा रुपये भाडे ऑटोरिक्षाचालक घेतात. अशीच स्थिती जिल्हाभरात आहे. तथापि, एवढ्या अंतरात दोन प्रवासी घेऊन गेल्यानंतर परत प्रवासी मिळणे कठीण होते. 

दिवसभरात २०० रुपये कमाई पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने  ऑटोरिक्षाचालकांना परवडणारे राहिले नाही. पूर्वी दिवसभर ऑटो चालविल्यानंतर त्यांना ४०० रुपयांपर्यंत कमाई होत असे; परंतु आता मात्र २०० रुपये कमाई होणेही कठीण आहे.

टॅग्स :washimवाशिमPetrolपेट्रोलDieselडिझेलauto rickshawऑटो रिक्षा