रविवारीही सर्व दुकाने, आस्थापनांस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:36 IST2021-03-14T04:36:32+5:302021-03-14T04:36:32+5:30

वाशिम : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशात अंशत: बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता रविवारीही ...

Also on Sundays, all shops and establishments are allowed from 9 am to 5 pm | रविवारीही सर्व दुकाने, आस्थापनांस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुभा

रविवारीही सर्व दुकाने, आस्थापनांस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुभा

वाशिम : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशात अंशत: बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता रविवारीही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शुक्रवार, १२ मार्च रोजी निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यात २६ फेब्रुवारी रोजी लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत डेअरी, दूध विक्री करणारी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या आदेशाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता या आदेशात बदल करून सर्व दुकाने, आस्थापना रविवारीही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व दुकाने, आस्थापना सातही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.

Web Title: Also on Sundays, all shops and establishments are allowed from 9 am to 5 pm