रेनकोट, प्लास्टिक, ताडपत्री विक्रीची मुभा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST2021-05-31T04:29:23+5:302021-05-31T04:29:23+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून कडक निर्बंध लागू आहेत. जीवनावश्यक, शेतीशी निगडित दुकाने व इतर काही ...

रेनकोट, प्लास्टिक, ताडपत्री विक्रीची मुभा द्या
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून कडक निर्बंध लागू आहेत. जीवनावश्यक, शेतीशी निगडित दुकाने व इतर काही आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कापड दुकाने तथा रेनकोट, छत्री, प्लास्टिक, ताडपत्री विक्री दुकाने पूर्णत: बंद ठेवण्यात आली. आता पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने पेरणीचा हंगाम सुद्धा जवळ आला आहे. ट्रॅक्टर अथवा बैलगाडीतून शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते शेतामध्ये न्यावे लागणार आहे. पावसामुळे खत, बियाणे ओले होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना प्लास्टिक व ताडपत्रीची प्रचंड आवश्यकता भासते. मात्र महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून प्लास्टिक, ताडपत्री, छत्री, रेनकोट विक्रीचे दुकाने पूर्णतः बंद आहेत. पावसाळा व खरीप हंगामाची पेरणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे असलेल्या प्लास्टिक, ताडपत्रीसह रेनकोट, छत्री विक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने दिलीप एकनाथ जाधव यांनी केली.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी शिरपूर परिसरात ४१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद पर्जन्यमापक गजानन वाढे यांनी केली आहे. शेतीविषयक कामाला मोठी गती मिळणार आहे.