अंगणवाडीत शालेय गणवेशाचे वाटप
By Admin | Updated: August 5, 2014 23:14 IST2014-08-05T23:14:50+5:302014-08-05T23:14:50+5:30
ध्रुव शाळेतील अंगणवाडी केंद्रामध्ये जनजागृती व गणवेश वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

अंगणवाडीत शालेय गणवेशाचे वाटप
वाशिम : एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्पांतर्गत येणार्या नगरपालिका ध्रुव शाळेतील अंगणवाडी केंद्रामध्ये ऑगस्टला स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती व गणवेश वाटपाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चक्रधर गोटे होते. तर शिक्षण सभापती भावनदास जिवनानी, नितीन उलेमाले, नगरसेवक राजू वानखेडे, शोभाताई अंभोरे, रामेश्वर माळेकर, संतोष वानखेडे, अरुण सरनाईक, घुगे, सावदेकर व गांजरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ.चरखा व आरोग्य सेविका रोहिणी सोभागे यांनी महिलांना स्तनपानाचे महत्व विषद करुन सांगितले. नगरसेवक राजू वानखेडे यांच्या हस्ते अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश तर रामेश्वर माळेकर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन बोरकर यांनी तर आभार अंगणवाडी सेविका नंदाताई गोटे यांनी मानले. यावेळी पिंपळकर, आपटे, बुंधे, छाया इंगोले, ज्योती इंगळे, संगिता पाकधने आदिंची उपस्थिती होती.