ग्रामपंचायत सचिवाला मुख्यालयाची ॲलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:42 IST2021-03-16T04:42:07+5:302021-03-16T04:42:07+5:30

भर जहाॅगीर येथे सचिव एन.के.भुसारी यांचा दूरध्वनी सतत बंद असल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात परवड होत असल्याच्या तक्रारी आहेत. मार्च ...

Allergy to HQ of Gram Panchayat Secretary | ग्रामपंचायत सचिवाला मुख्यालयाची ॲलर्जी

ग्रामपंचायत सचिवाला मुख्यालयाची ॲलर्जी

भर जहाॅगीर येथे सचिव एन.के.भुसारी यांचा दूरध्वनी सतत बंद असल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात परवड होत असल्याच्या तक्रारी आहेत.

मार्च ऐंडिंग असल्याने भर जहागिर ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांना प्रारंभ झाला आहे. यातील काही विकास कामामध्ये शासनाच्या अंदाजपत्रकाला बगल देत सिमेंट रस्ता कामे केली जात आहेत. यातील काही तक्रारी अथवा काही सुचना ग्रामस्थांना सचिवाकडे करायच्या असतांना मागील अनेक दिवसांपासून सचिव भुसारी यांचा दुरध्वनी बंद येतो. अनेक ग्रामस्थांना ग्रामपंचायतमध्ये नाहक चकरा मारावे लागत आहेत. गावामध्ये लाखो रूपयांचे सिमेंट रस्ता कामे सचिवांच्या गैरहजेरी होत आहेत. गावात होत आसलेल्या एकाही विकास कामावर कामाच्या रक्कमेचा फलक लावलेला दिसून येत नाही. याची कल्पना सुध्दा सचिवांना आहे किंवा नाही असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून येथे सुरु असलेल्या चुकीच्या काम संदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे.

Web Title: Allergy to HQ of Gram Panchayat Secretary