जलयुक्त शिवार अभियानासाठी सर्व यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे

By Admin | Updated: January 29, 2015 01:39 IST2015-01-29T00:33:28+5:302015-01-29T01:39:06+5:30

आढावा सभेत विभागीय आयुक्त राजूरकर यांच्या जलयुक्त शिवार अभियान गांर्भीयाने राबविन्याबाबत सूचना.

All the systems should work seriously for the Jalakari Shivar campaign | जलयुक्त शिवार अभियानासाठी सर्व यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे

जलयुक्त शिवार अभियानासाठी सर्व यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे

वाशिम : सिंचन क्षमता वाढीसाठी हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाकडून राज्य शासन व सर्वसामान्य शेतकर्‍यांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी संबधित सर्व यंत्रणांनी गांभीयार्ने काम करावे, अशा सूचना अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन मोहीम, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी बी. के. इंगळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार, दिनकर काळे, राजेश पारनाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. पाडेवार, आत्माचे प्रकल्प संचालक विजय चवाळे, तहसीलदार आशिष बिजवल, बी. डी. अरखराव, श्रीकांत उंबरकर, ए. एम. कुंभार, ए. पी. पाटील यांच्यासह सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. धडक सिंचन योजनेविषयी बोलताना विभागीय आयुक्त राजूरकर म्हणाले की, या योजनेंतर्गत असलेल्या सर्व विहिरींची कामे ३१ मार्च २0१५ पूर्वी काम करायची असून सर्व अधिका?्यांनी या कामाला प्राधान्य द्यावे. विहिरींची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल. विभागीय अधिकारी व तहसीलदारांनी विहिरींचे लाभार्थी व संबंधित यंत्रणा यांची एकत्रित बैठक घेवून या विहिरींची कामे पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे अवाहन केले आहे.

Web Title: All the systems should work seriously for the Jalakari Shivar campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.