सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:40 IST2021-01-20T04:40:01+5:302021-01-20T04:40:01+5:30
कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार ही ग्रामपंचायत बहुचर्चित असून, तालुकावासीयांच्या नजरा या ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे लागल्या होत्या. १३ सभासदसंख्या असलेल्या ...

सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष
कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार ही ग्रामपंचायत बहुचर्चित असून, तालुकावासीयांच्या नजरा या ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे लागल्या होत्या. १३ सभासदसंख्या असलेल्या उंबर्डा बाजार ग्रामपंचायतीत चौधरी-मोरे गटाला आठ जागा, भाजपा समर्थित गटाला तीन, तर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती देवरे यांच्या ग्रामविकास आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे . विशेष म्हणजे निवडून आलेल्या १३ सदस्यांमधून जवळपास ५ ग्रामपंचायत सदस्य सरपंच पदासाठी दावेदारी करण्याची चिन्हे दिसत असून, अनेक ग्रामपंचायत सदस्य सरपंच पद नाही तर किमान उपसरपंच पद तरी मिळावे यासाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होण्याआधीच मोर्चेबांधणीसाठी कामी लागल्याचे चित्र दिसत आहे.
यावर्षीच्या निवडणुकीत नव्या दमाच्या उमेदवारांना मतदारबांधवांनी पसंती दिल्याने उंबर्डा बाजारच्या गेल्या १० वर्षापासून आता तरी गती मिळणार काय, यासाठी सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले आहे.