वाशिम जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस
By Admin | Updated: July 20, 2014 22:44 IST2014-07-20T22:44:09+5:302014-07-20T22:44:09+5:30
पावसामुळे शेतकर्यांच्या शेतकर्यावरची चिंता काहीअंशी दुर झाल्याचे दिसून येत होते.

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस
वाशिम : जिल्ह्यात २0 जुलैला सकाळी १0 वाजतापासून पावसाला सुरूवात झाली होती. सकाळी सुरू झालेला पाऊस दिवसभर रिमझिम सुरच होत्र दरम्यान या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतकर्यावरची चिंता काहीअंशी दुर झाल्याचे दिसून येत होते. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्यानाही गती आली. . यंदा मृग नक्षत्रामध्ये जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकर्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. परंतु मृगात रिमझिम बसणार्या पावसाने त्यानंतर मात्र अचानक दडी मारली. परिणामी, जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या. शेतकर्यांनी पेरलेली बियाणे अंकुरली खरी, मात्र पावसाअभावी यातील बहुतांश पिके करपू लागली होती. पावसाला पुन्हा सुरूवात झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.