पहाटेच उघडतात दारूची दुकाने

By Admin | Updated: December 5, 2014 00:34 IST2014-12-05T00:34:46+5:302014-12-05T00:34:46+5:30

उत्पादन शुल्क अधिकार्‍यांची डोळेझाक; दारू विक्रेत्यांना कोण आवर घालणार?

Alcohol shops open early in the morning | पहाटेच उघडतात दारूची दुकाने

पहाटेच उघडतात दारूची दुकाने

वाशिम : मोठय़ा शहरातील देशी दारू दुकानांची उघडण्याची वेळ सकाळी १0 आणि बंद करण्याची वेळ रात्री १२ अशी आहे; मात्र हे नियम धाब्यावर बसवून शहरातील देशी दारूची दुकाने सकाळी ६.३0 वाजताच उघडली जात असल्याचे लोकमतने ४ डिसेंबर रोजी सकाळी जिल्हय़ातील मुख्य शहरांमध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून उघडकीस आले.
जिल्हय़ात अनेक ठिकाणी पहाटे देशी दारूंची दुकाने उघडतात, याची कल्पना सर्वांना असताना अशा दुकानदारांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे; मात्र अनेक महिन्यांपासून याप्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
जिल्ह्यामधील देशी दुकानाच्या माध्यमामधून उत्पादन शुल्क विभागाला लाखो रूपयाचा महसूल मिळतो.
यामुळे देशी दारूची दुकान उघडण्यासंदर्भात शासनाने नियम घालून दिले आहेत. त्यानुसार ह्यकह्ण दर्जाच्या नगरपालिका हद्दीतील परवानाधारक देशी दारू उघडण्याची व बंद करण्याची वेळ सकाळी १0 ते रात्री १0 अशी आहे. तर जिल्ह्याच्या ठिकाणी ही वेळ सकाळी १0 ते रात्री १२ वाजेपर्यंत अशी आहे; मात्र हा नियम सर्रास पायदळी तुडविल्या जात असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंगवरून उघडकीस आणले आहे.
पहाटेच दुकाने उघडणार्‍यांमध्ये वाशिम शहरामध्ये लक्झरी बस स्थानक शेजारी असलेले देशी दारू दुकान, पाटणी चौकामध्ये असलेले देशी दारू दुकान, महात्मा फुले मार्केट समोर असलेले देशी दारू दुकान, जुना रिसोड नाक्यावर असलेले दुकान, नगर परिषदजवळ असलेल्या रमाबाई नगर समोरील दुकान, कानडे हॉस्पिटल समोर असलेले देशी दारूचे दुकान, सम्राट वाईन बार शेजारी असलेले देशी दारू दुकान. या दुकानांचा समावेश आहे. ही सर्व देशी दारूची दुकाने सकाळी ७ ते ८ वाजल्यापासूनच उघडलेली होती. या दुकानामध्ये सकाळपासूनच ग्राहकांची ये-जा सुरू होती. असाच प्रकार रिसोड, कारंजा, मालेगाव, मंगरूळपीर शहरांमध्ये दिसून आला.

Web Title: Alcohol shops open early in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.