अँपे रिक्षातून दारू जप्त
By Admin | Updated: October 15, 2014 00:59 IST2014-10-15T00:59:14+5:302014-10-15T00:59:14+5:30
धनज पोलिसांच्या निवडणूक भरारी पथकाची कारवाई.

अँपे रिक्षातून दारू जप्त
कामरगाव (वाशिम): विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अनुचित घटनांना आवर घालण्यासाठी फिरणार्या धनज पोलिसांच्या निवडणूक भरारी पथकाने विळेगाव फाट्यावर एका अँपे रिक्षातून देशी दारूच्या बाटल्यांचे १0 खोके जप्त केले. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सांयकाळच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी होणार्या मतदानाच्या पृष्ठभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कामरगाव पोलिसांच्या वतीने मतदारसंघातील विविध रस्त्यांवर पोलिस पथक तैनात करण्यात आले. या पथकाकडून रस्त्यावरून जाणार्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असताना एमएच-३७, जी-३४८७ क्रमांकाच्या अँपे रिक्षात देशी दारूच्या बाटल्यांचे अंदाजे २५ हजार रूपये किमतीचे १0 खोके पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी अँपे आणि दारू मिळून एकूण १ लाख ७0 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करून अँपेचालक सै. सलाम सै. मुबारक यास अटक केली. या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा ६५ ई नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई करणार्या धनज पोलिसांच्या पथकाचे प्रमुख अरुण वडते, सहायक पोलिस निरीक्षक जाधव, हेडकॉन्स्टेबल लष्कर चव्हाण, शिवदास चव्हाण यांचा समावेश होता.